खानापूर : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी स्वच्छ आणि शिस्तीने राहण्याचे शिकावे असे उद्गार निट्टूर गावचे सुपुत्र शिक्षणप्रेमी श्री. सुरज गणेबैलकर यांनी विद्यार्थ्यांना ओळखपत्र वितरणावेळी काढले.
सरकारी शाळांच्या विकासासाठी सध्या शिक्षकांसोबत काही जागरूक पालक सुद्धा प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा निट्टूर येथे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रेमी शाळेचे माजी विद्यार्थी श्री. सुरज गणेबैलकर यांच्यातर्फे ओळख पत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला एसडीएमसी अध्यक्ष श्री. दशरथ गणेबैलकर, पालक श्री. नागराज देसाई, शिक्षण प्रेमी श्री. दामोदर कुसुमळकर, श्री. संतोष चोपडे आणि प्रभारी मुख्याध्यापिका सी. के. पाटील, माधुरी कालकुंद्रीकर, राजश्री भराडे, नाजनीन पटेल, सिद्धाप्पा गावडे शिक्षक वर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta