Wednesday , March 4 2026
Breaking News

मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली : गर्भवती महिला बचावली

Spread the love

 

खानापूर :  पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने एका गर्भवती महिलेने जीव मुठीत घेऊन पावसात रात्र काढल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे.
खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने कळमळगी गावातील घराची पडझड झाल्याने खळबळ उडाली आहे. घरात सहा जण राहत होते. अचानक घराची भिंत कोसळल्याने घरातील लोकांनी रात्रभर पावसात काढली.
घर कोसळून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊनही स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली नाही, असा संताप कुटुंबीय व्यक्त करत आहेत. नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *