Tuesday , March 3 2026
Breaking News

दुचाकीवरून पडल्याने आशा कार्यकर्ती ठार

Spread the love

 

लोंढा : लोंढा येथून रामनगरकडे जात असताना दुचाकीवरून पडल्याने लक्ष्मी झरंबेकर (वय 45) रा. मुंडवाड तालुका खानापूर ही आशा कार्यकर्ती ठार झाली. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रामनगरजवळील पटेल हार्डवेअर समोर हा अपघात घडला. लक्ष्मी या लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठकीला आल्या होत्या. तेथून परत आपल्या गावाकडे जाताना एका दुचाकीस्वाराने लिफ्ट दिली. पण दुचाकीवरून पडून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तातडीने रामनगर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण अधिक उपचारासाठी बेळगावला घेऊन जात असताना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खानापूर सरकारी दवाखान्यात मृतदेह ठेवण्यात आला. याबाबत रामनगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील चौकशी रामनगर पोलीस करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *