

खानापूर : खानापूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिज जवळच असलेल्या राजा टाईल्स शेजारी स्क्रॅप आणि भांड्याच्या दुकानातील नवीन भांड्यासह अनेक वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. जवळपास 3 ते 4 लाखाच्या किमतीची भांडी चोरट्यांनी सोमवारी रात्री 12:40 ते 3 च्या दरम्यान ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. या चोरट्यांनी चक्क टाटा एस गाडी लावून चोरी केल्याचे दुकान मालिक रमेश बाबू नेकनार यांनी सांगितले आहे,
मंगळवारी सकाळी रोजच्याप्रमाणे भांडी दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी समोरील दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला असावा, त्याच बाजूला असलेला पत्र्याचा दरवाजा तोडून भांडी बाहेर टाटा एस मध्ये भरून नेल्याचे सांगण्यात येते, भांडी चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्ही डीव्हीआरची देखील या चोरट्यांनी तोडफोड केल्याचे स्पष्ट दिसत आहे. भांडी मिक्सर व भांड्यावरील प्लेट्या चोरी झाल्याचे सांगण्यात येते, ही घटना पोलिसांना समजतात खानापूर पोलिसांनी या घटनेची माहिती नोंद करून घेतली आहे. पण अद्याप एफआयआर झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. ही चोरीची घटना बाजूला असलेल्या हायड्रोलिक्स दुकानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. चोरट्यांचा तपास करण्यास पोलिसांना सोयीस्कर झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta