खानापूर : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव तसेच जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खानापुर शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत बांधण्यात आलेल्या 60 खाटांचा माता व बाल रुग्णालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि नाबार्ड RIDF-30 योजनेंतर्गत 100 खाटांच्या तालुका रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभ उद्या बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला असून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर राहणार आहेत.
सार्वजनिक रुग्णालय, खानापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत बांधण्यात आलेल्या 60 खाटांच्या माता व बाल रुग्णालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि नाबार्ड RIDF-30 प्रकल्पांतर्गत 100 खाटांच्या तालुका रुग्णालयाचा पायाभरणी समारंभ विविध खात्याच्या मंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडराव हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, जगदीश शेट्टर, खासदार प्रियांका जारकीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे लोकप्रतिनिधी, तसेच विधान परिषद सदस्य, उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसन्नावर व मुख्य वैद्यकीय अधिकारी सार्वजनिक रुग्णालय खानापूर डॉ. नारायण वड्डीन्नावर यांनी दिली आहे.