खानापूर : पदवीपूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि सीआरएस पदवीपूर्व कॉलेज इटगी यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा सीआरएस पदवीपूर्व महाविद्यालय इटगी यांच्या मैदानावरआयोजित केल्या होत्या या क्रीडा स्पर्धेत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालय नंदगड यांनी सहभाग घेतला होता आणि विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. मुलांच्या कबड्डीमध्ये प्रथम कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक, मुलींच्या कबड्डीमध्ये द्वितीय क्रमांक, मुलांच्या हॉलीबॉलमध्ये द्वितीय क्रमांक संपादित केले आहेत. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये काजल बेलवटकर हिने 3000 मी धावणे प्रथम क्रमांक, हार्डल्समध्ये द्वितीय क्रमांक, वैभवी इशरान हिने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक, भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक, मुक्ता खानापूरकर हिने थाळी फेकमध्ये द्वितीय क्रमांक, अनन्य धबाले हिने 3000 मी. चालणे प्रथम क्रमांक, संगीता भुजगुरव हिने दोरी उडी प्रथम क्रमांक, सूरज पाटील यांने 400 मी. द्वितीय क्रमांक, हार्डल्समध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. या सर्व विध्यार्थीना कॉलेजच्या प्राचार्या दीपा हन्नूरकर, टीम मॅनेजर प्रा. आय. पी. गावडे, प्रा. एम. आर. मिराशी, प्रा. एन. टी. पाटील, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. राणी मडवळकर या सर्वांचे मार्गदर्शन मिळत आहे.