Tuesday , March 3 2026
Breaking News

हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ; नवविवाहितेची आत्महत्या

Spread the love

 

खानापूर : हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून खानापूर तालुक्यातील नंदगड येथील एका नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अर्शअहमदी मुदस्सर बसरीकट्टी (19) रा. काझी गल्ली असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती मुदस्सर रियाजअहमद बसरीकट्टी (32) यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अर्शअहमदी हिचे माहेर खानापूर तालुक्यातील गोलिहळ्ळी आहे. याच वर्षी जून महिन्यात मुदस्सर याच्याशी तिचा विवाह झाला होता. तेव्हापासून हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ सुरू होता. छळाला कंटाळून अर्शअहमदी गोलिहळ्ळी या आपल्या माहेरी गेली होती. आठ दिवसापूर्वी पुन्हा तिला सासरच्या मंडळींनी बोलावून आणले होते. पण त्या त्रस्त विवाहितेने सासरच्या वारंवार जाचाला कंटाळून गेल्या सोमवारी विष प्राशन केले होते. तातडीने तिला खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तिथून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर सदर प्रकरणी पोलिसात कळवण्यात आले व एमएलसी झाली होती.
सदर विवाहितेच्या उपचारासाठी अधिक प्रयत्न करण्यात आले. परंतु तिच्यावर उपचार झाला नाही. सोमवारी दुपारी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी विवाहितेच्या घरच्यांकडून सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ होत होता. त्यातूनच आपल्या मुलीने विष प्राशन केल्याची तक्रार नंदगड पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार सदर विवाहितेचा पती मुदस्सर बसरीकट्टी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *