Tuesday , October 15 2024
Breaking News

एकाला भोसकल्याप्रकरणी बीएसएफ जवानाला अटक

Spread the love

बेळगाव : हॉटेलमध्ये बिल भरण्यावरून झालेल्या भांडणात एका तरुणाला बीएसएफ जवानाने भोसकल्याची घटना घडली असून आरोपीला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली.

बेळगावातील सदाशिव नगर येथील आई हॉटेलमध्ये गँगवाडीतील तरुण जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर मालकाला पैसे देण्यावरून भांडण झाले. तिथे जेवत असलेला बीएसएफचा जवान परशराम रामगोंडनावर वाद मिटवण्यासाठी सरसावला पण गँगवाडीतील अल्ताफ चौघुले यांच्याशी जवानाशी वादावादी सुरू झाली. या वादावादीत बीएसएफ जवानाने आपल्याकडील चाकूने अल्ताफ याच्यावर वार करून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बीएसएफ जवानाला पोलिसांनी अटक करून हिंडलगा कारागृहात रवानगी केली.

About Belgaum Varta

Check Also

स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण

Spread the love  बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *