खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये, महात्मा गांधी ग्रे वॉटर मॅनेजमेंट योजनेतून मंजूर झालेल्या, 3,45,78,000. (3 कोटी 45 लाख 78 हजार) रुपयांच्या योजनांचे भूमिपूजन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते उद्या मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे.
पारीश्वाड या ठिकाणी 99 लाख 49 हजार रुपयाच्या योजनेचे भूमिपूजन, सकाळी 9.00 वाजता पारीश्वाड या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 9.30 वाजता इटगी या ठिकाणी 1 कोटी 21 लाख 13 हजार रुपयांच्या योजनेचे भूमिपूजन होणार आहे. यानंतर नंदगड या ठिकाणी सकाळी दहा वाजता 1 कोटी 25 लाख 16 हजार रुपयांच्या योजनेचे भूमिपूजन होणार आहे.
या अनुषंगाने आमदार विठ्ठलराव हलगेकर सकाळी 10.15 वाजता कुणकीकोप रस्त्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर 10:45 वाजता नंदगड येथील ग्रामदेवता महालक्ष्मी यात्रेनिमित्त, ग्रामपंचायत नंदगड, यांनी आयोजित केलेल्या बैठकीत भाग घेणार आहेत.
पारीश्वाड, ईटगी, नंदगड आदी याठिकाणी होणाऱ्या भूमिपूजनाला स्थानिक ग्रामस्थ, नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याची विनंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.