खानापूर : १ नोव्हेंबर काळ्या दिनासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. तेंव्हापासून १ नोव्हेंबर हा संपूर्ण सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त खानापूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येते. यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बैठक बोलाविण्यात आली आहे, तरी आजी -माजी लोकप्रतिनिधी तसेच समितीप्रेमी कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील तसेच सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta