खानापूर : पंधरा दिवसांपूर्वी चापगाव हडलगा रस्त्यावर सदर बिबट्या दिसून आला होता. सदर बिबट्याच्या भक्ष्यस्थानी कुत्री व बकरी पडत आहेत. काही लोकांची बकरी नाहीशी झाल्याचे निदर्शनाला आले. मात्र प्रत्यक्षात खैरवाड डोंगरी जवळ हडलगा येथील एका शेतकऱ्याचा एक चांगला ठगर व बकरी ठार झाल्याची बाब निदर्शनाला आली. काही बकरी जखमी झाल्याचेही दिसून आल्याने सदर बिबट्या धोक्याचा बनला आहे. त्यासाठी वन खात्याने तातडीने याची दखल घेऊन त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta