खानापूर : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षकांचा मौलाचा वाटा असतो तसेच विद्यार्थ्यांचा पाया प्राथमिक शाळांमध्ये घट्ट होतो त्यामुळे पुढे विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन यशस्वी होतात, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले आहे.
हलशीवाडी येथिल दत्तात्रय देसाई याना शिक्षण खात्याचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबाबत ग्रामस्थांतर्फे रविवारी थडेदेव मंदिर येथे सत्कार कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिक देसाई होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त मुख्याध्यापक नारायण देसाई, महेश शिवाजी देसाई, कृष्णराव देसाई, वामन देसाई, कृषी पत्तीन सोसायटीचे माजी संचालक अनंत देसाई, संजय देसाई होते. प्रारंभी निवृत्त मुख्याध्यापक बबन देसाई यांनी प्रास्ताविक करताना दत्तात्रय देसाई यांनी अत्यंत कष्टाने शिक्षण घेतले. नोकरीची सुरुवात जोयडा तालुक्यातील दुर्गम भागातून केली. त्यानंतर अनेक गावात सेवा बजावून गुंडपी येथील शाळेत रुजू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्यासह शाळेचा मोठ्या प्रमाणात विकास करून घेतला आहे त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. येणाऱ्या काळामध्येही त्यांनी अधिक चांगले कार्य करावे असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे चंद्रकांत देसाई, माणिक देसाई आदींच्या हस्ते दत्तात्रय देसाई यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मिलिंद देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.
नारायण देसाई यांनी सूत्रसंचालन तर आकांक्षा देसाई यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी रवींद्र देसाई, मधुकर देसाई, विठ्ठल देसाई, सुधीर देसाई, महेश देसाई, ग्राम पंचायत सदस्य दिनेश देसाई, रमेश देसाई, विनायक देसाई, प्रसाद देसाई, गौरव देसाई, श्रीपाद देसाई, निखिल देसाई, वैभव देसाई, शामराव देसाई यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.