खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवस्मारक भवन येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई हे होते. यावेळी कर्नाटक राज्याचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे दिनांक ९ डिसेंबरपासून होत आहे. या अधिवेशनास विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
बैठकीत उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक महाराष्ट्र एकीकरण समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले की, गेली 67 वर्षे सीमा लढा चालू आहे. महाराष्ट्रात सामील होण्यासाठी सीमावासीय कायदेशीर मार्गाने लढा देत आहोत. मात्र कर्नाटक सरकारचा मुजोरीपणा दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे त्यामुळे कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी खानापूर तालुक्यातील जास्तीत जास्त मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकील कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, खजिनदार संजीव पाटील, गोपाळराव पाटील, पांडुरंग सावंत, डी. एम. भोसले, राजाराम देसाई, शंकर गावडा, बळीराम देसाई, जयसिंगराव पाटील, अमृत शेलार, भीमसेन करंबळकर, म्हात्रू मन्नोळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta