
खानापूर : खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या सौजन्याने रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल मारूती नगर खानापूर येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी शिबीराला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार सेक्रेटरी एआयसीसी डॉ. अंजलीताई निंबाळकर, माजी आमदार अरविंद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसन्नावर, डॉ. नारायण वड्डिन्नवर आदी उपस्थित राहणार आहेत.
शिबीरासाठी तज्ञ डॉक्टर!
डॉ. संतोष हजारे पोट विकार, डॉ. देवदत्त देसाई जनरल फिजिशयन, डॉ. रोहित जोशी सर्जन डॉ. संतोष शिंदे त्वचा रोगतज्ञ, डॉ. महेश कल्लोळी कर्क रोगतज्ञ, डॉ. प्रविण जैन संधीवात विकार तज्ञ, डॉ. दिपक पुजार हृदयविकार तज्ञ, डॉ. विनायक पाटील बाल रोग तज्ञ, डॉ. संदिप चिंदी मेंदू विकार तज्ञ, डॉ. दत्तप्रसाद गिजरे, डॉ. हर्षद सुतार कान, नाक, घसा तज्ञ, डॉ. किरणकुमार पुजार श्वास कोष तज्ञ, डॉ. देवेगौडा अस्थीरोग तज्ञ, डॉ. रितेश वेर्णेकर किडणी रोग तज्ञ, डॉ. अभय पट्टाडे मुत्र रोग तज्ञ आदी तज्ञ डॉक्टर तपासणीसाठी येणार आहेत. तेव्हा आरोग्य तपासणीला येताना आयुष्यमान भारत स्कीम रजिस्ट्रेशनसाठी लागणारे रेशनकार्ड, आधार कार्ड लिंक मोबाईल आणावे व आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी ई. नाडगौडा, उपाध्यक्ष डॉ. एम. के. कुंभार, सेक्रेटरी डॉ. सागर नार्वेकर, खजिनदार डॉ. किरण लाड यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta