खानापूर : सहल हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा भाग असतो. सहल म्हणजे विद्यार्थी जीवनातील रोमहर्षक अनुभव असतो. मराठा मंडळ शिक्षण संस्था अभ्यासाबरोबर कला, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांना महत्त्व देणारी शिक्षण संस्था असल्याने अशा शैक्षणिक उपक्रमांना मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू या नेहमीच प्राधान्य व प्रोत्साहन देत आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी काही काळ अभ्यासातून बाहेर पडून मनाचा विरंगुळा करावा, ताणतणावा पासून मुक्त व्हावं, निसर्ग, परिसर, नद्या, नाले व जीवनशैली कशी जवळून समजून घेता येईल? ते पहावं! ऐतिहासिक स्थळे, संस्कृत आणि पर्यावरण काळजी कशी घ्यावी? यासाठी शैक्षणिक सहल हा एक प्रात्यक्षिक शिक्षणाचा भाग असतो.
ताराराणीच्या विद्यार्थिनींचा जिज्ञासा वाढावी, कल्पना शक्तीला नवे पंख फुटावेत, नवा प्रदेश नीट न्याहळता यावा, ऐतिहासिक गडकिल्ले समजावून घेता यावेत, सांघिक भावना मैत्रीचा दुवा घट्ट बांधता यावा यासाठी यासाठी महाराष्ट्राचा कोकण परिसर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि गणपतीपुळे अशा शैक्षणिक सहलीचा प्रवास ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील प्राचार्य व प्राध्यापक वर्गाने नियोजित केला असून तीन दिवसाचे नियोजन असलेल्या या सहलीत या महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या आहेत तसेच या शैक्षणिक सहलीचा आरंभ शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी झाला. प्राचार्य अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल नियोजन करण्यास प्रा. आय सी सावंत, प्रा टी आर जाधव, प्रा मनिषा यलजी, प्रा एन ए पाटील व सर्व प्राध्यापक वर्गाने खूप परिश्रम घेतले आहेत. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातील बोचऱ्या थंडीची तमा न बाळगता या सहलीला शुभेच्छा देण्यासाठी पालकवर्ग मोठा संख्येने उपस्थित होता.