
खानापूर : दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी आढळल्याने झालेल्या भीषण अपघातात रायबाग तालुक्यातील एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी खानापूर – पारीश्वाड मार्गावर, दोडहोसुर व यडोगा क्रॉस नजीक घडली आहे. सावंत निंगाप्पा शॅंडगे (वय 22 वर्षे) राहणार मानबरगट्टी नंदीकुरली, तालुका रायबाग असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सावंत शिंदे व
अभिषेक निंगाप्पा आगसिमनी हे दोघेजण दुचाकी (केए 23 ईवाय 7009) हिरो स्प्लेन्डर प्लस मोटारसायकलवरून पारीश्वाड-खानापूर रस्त्यावरून खानापूरकडे निघाले होते. मोटारसायकल भरधाव वेगात आणि बेदरकारपणे चालवत येत असताना मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. त्यामुळे सावंत शिंदे हा जागीच ठार झाला. तर अभिषेक हा गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta