खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे सोमवारी खानापूर शहरात हुतात्मा दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा व तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. यासाठी पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.
तसेच दुपारी ११ वाजता वर्दे पेट्रोल पंपावर सीमाभागातील जनतेने एकत्र येऊन येथून कोल्हापूर येथे रवाना व्हायचे आहे. तसेच, दुपारी २ ते सायंकाळी ५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे धरणे कार्यक्रम करून सकल मराठी समितीतर्फे सायंकाळी हुतात्म्यांना अभिवादनसाठी सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन करून खानापूर शहरातील स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ, चौराशी देवी, केंचापूर गल्ली, बुरुड गल्ली या मार्गावरून फिरून पत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली.
यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, माजी सभापती मारुती परमेकर, गोपाळ पाटील, भीमसेन करंबळकर, जयसिंग पाटील, सदानंद पाटील, पुंडलिक पाटील, शामराव साबळे, जयराम देसाई, प्रकाश चव्हाण, शिवाजी पाटील, कृष्णा मनोळकर, नाना घाडी, विठ्ठल गुरव, राजाराम देसाई, लक्ष्मण कसरलेकर यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta