खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे हुतात्मा दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा व तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. यासाठी जांबोटी भागात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.
तसेच दुपारी ११ वाजता वर्दे पेट्रोल पंपावर सीमाभागातील जनतेने एकत्र येऊन येथून कोल्हापूर येथे रवाना व्हायचे आहे. तसेच, दुपारी २ ते सायंकाळी ५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे धरणे कार्यक्रम करून सकल मराठी समितीतर्फे सायंकाळी हुतात्म्यांना अभिवादनसाठी सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन करून जांबोटी बस स्टँड तसेच जांबोटी बाजारपेठ येथे मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी सभापती मारुतीराव परमेकर, चंद्रकांत देसाई, पावणाप्पा देसाई, राजू देसाई बबन गुरव, तानाजी कांबळे, प्रवीण जांबोटकर, महेश जांबोटकर, विजय सुतार, इंद्रजीत सडेकर, महेश कांबळे, यांच्यासह सरचिटणीस आबासाहेब दळवी, खजिनदार संजीव पाटील, समिती नेते गोपाळराव पाटील, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, वसंत नवलकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta