खानापूर : शैक्षणिक फंडाच्या वतीने वार्षिक सप्ताच्या निमित्ताने सामान्य परीक्षेचे आयोजन करण्यात आले. ओलमणी गावात पारंपरिक शैक्षणिक फंडाची निर्मिती केली गेलेली आहे. आणि या फंडातून विविध असे शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रत्येक इयत्तेतून येणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकांना तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव केला जातो. त्याच धरती वरती यंदापासून या शैक्षणिक फंडाच्या वतीने स्पर्धा परीक्षेची आकलन व्हावे, स्पर्धा परीक्षेची माहिती, उपलब्ध व्हावी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी त्यांची तयारी व्हावी या या हेतूने सामान्य परीक्षेचे आयोजन केले. गाव मर्यादित या सामान्य परीक्षेचे पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा गटानुसार आयोजन करण्यात आले होते. मराठी प्राथमिक शाळा ओलमणी व राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी या ठिकाणी या सामान्य परीक्षेचे नियोजन करण्यात आले. या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. पहिल्यांदाच होत असलेल्या या परीक्षेत उत्साहाने विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला. एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हाच या मागचा उद्देश होता. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विविध ठिकाणी कार्य करणाऱ्या गावातील सर्व शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta