खानापूर (वार्ता) : सध्या तालुक्यात भात मळण्याचा कामाला जोर आला आहे. त्यातच मळणी केलेले गवत घेऊन जाण्याची शेतकरी वर्गाची धावपळ सुरू आहे.
गुरूवारी दि. १३ रोजी सायंकाळी पणजी-बेळगाव महामार्गावरील खानापूर शहराजवळ ओमकार हाॅटेलसमोर गवताने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला आणि महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे अर्धातास वाहने अडकून राहीली. काही काळ बायपास रस्त्याने वाहनाची ये-जा सुरू करण्यात आली.
यावेळी पलटी झालेला ट्रॅक्टर काढण्यासाठी नागरिकानी मदत केली. नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर उभा करण्यात आला.
यावेळी गवताची नासाडी झाली.
यंदा अवकाळी पावसाने भाता बरोबर गवताचे नुकसान झाले. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकरी वर्गाला भेडसावत आहे. तेव्हा चाऱ्याचा साठा करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. त्यातच गवताचे ट्रॅक्टर पलटी होऊन ही गवताचे नुकसान होण्याचे प्रकार होत आहेत.
Check Also
मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे
Spread the love खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच …