जगद्गुरु श्री मंजुनाथ स्वामीं उपस्थितीत राहणार
खानापूर : खानापूर लक्ष्मी मंदिर या ठिकाणी आज दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता खानापुरातील मराठा समाज बांधवांसाठी सकल मराठा जागृती महासभेचे आयोजन करण्यात आले असून ही सभा पक्षविरहित आहे. सर्व राजकीय पक्षातील मराठा समाज बांधवांनी व मराठा समाजाच्या प्रमुख व्यक्तींनी या बैठकीला उपस्थित राहायचे आहे. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी क्षत्रिय मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांताचार्य श्री मंजुनाथ भारती महास्वामीजी उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सभेमध्ये मराठा समाज जागृती, शैक्षणिक व सामाजिक जागृती, सांस्कृतिक जागृती व व्यसनाधीनता या सर्व दृष्टीने मराठा समाज बांधवांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी व मराठा समाज प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta