
खानापूर : बेळगाव – गोवा मार्गावरील चोर्ला गावानजीक आज शनिवार दिनांक 3 मे 2025 रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास अशोक लेलँड मालवाहू रिक्षा आणि दुचाकीची धडक झाल्याने कणकुंबी येथील युवक विक्रम कोळेकर (वय 28 वर्ष) हा युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, विक्रम कोळेकर हा युवक गोवा येथील एका बँकेत कामाला होता. शिवजयंतीच्या निमित्ताने तो गावाकडे दोन दिवस रजेवर आला होता. आपल्या घरातील सर्व कामे आटोपून तो आज शनिवारी सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून गोव्याला जात होता. त्यावेळी चोर्ला नजीक हा अपघात घडला असल्याचे समजते. घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta