Monday , December 8 2025
Breaking News

“जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” : अवनिशला भावपूर्ण श्रद्धांजली!!

Spread the love

 

 

“जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणेच आमचा सर्वांचा लाडका हसतमुख असा कुमार अवनिश विनोद देसाई मुळगाव डोंगरगाव सध्या राहणार पणजी गोवा याची दि. 26 एप्रिल 2025 रोजी कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. आज अकराव्या दिवसानिमित्त त्याच्याविषयी थोडक्यात…
कुमार अवनिश हा ओल्ड गोवा ग्रामपंचायतचे सदस्य विनोद देसाई व सौ. मीनल देसाई यांचा चिरंजीव तर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी यांचा नातू होय.
अवनिशचा जन्म 13 सप्टेंबर 2014 रोजी झाला. जणू आनंदाचा सळसळता झरा असणाऱ्या अवनिशचा अवघ्या 10 वर्षाचा जीवनप्रवास अगदी थक्क करणारा, अविस्मरणीय व गोड आठवणींचा ठसा उमटविणारा असाच आहे. अवघ्या दहा वर्षाचे आयुष्य घेऊन जन्मलेला अवनिश हा जन्मापासूनच शांत, प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचा होता. अवनिश हा शाळेत देखील अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. अभ्यासाबरोबरच शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात व स्पर्धांमध्ये त्याचा सहभाग असायचा. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच त्याला मैदानी खेळाची देखील प्रचंड आवड होती. तो लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीचा होता. जिथे जाईल तिथे आनंद पसरविणारा आमचा अवनिश पप्पा, मम्मी, आजी-आजोबा, काका, मामा, मावशी तसेच भावंडांचा लाडका होता. लहान वयात देखील थोरामोठ्यांसोबत वागण्याची जाण त्याला होती. त्यामुळे तो कुटुंबीयांसोबतच मित्र परिवाराला देखील हवाहवासा वाटायचा पण म्हणतात ना “जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणे सर्वत्र आनंद पसरवणाऱ्या अवनिशची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि आमच्या कुटुंबाच्या बागेतील नुकताच उमललेले सुंदर फुल परमेश्वराच्या चरणी नियतीने अर्पण केले. अवनिशच्या जाण्याने दळवी आणि देसाई कुटुंबीयात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. संपूर्ण कुटुंब दुःखाच्या महासागरात लोटले गेले आहे. परमेश्वर आम्हाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो व बाळ अवनिशच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

– सौ. शिवानी उमेश पाटील, वडगाव – बेळगाव (मावशी)

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *