Monday , September 21 2026
Breaking News

हुबळीजवळ लॉरी- कार यांच्यात भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

हुबळी : हुबळी तालुक्यातील कुसुगल गावाजवळील इंगळहळ्ळी क्रॉसजवळ कार आणि लॉरी यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

विजयपुरहून हुबळीकडे येणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या लॉरीला धडकली. धडक इतकी भीषण होती की ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. श्वेता (२९), अंजली (२६), संदीप (२६), विठ्ठल (५५) आणि शशिकला (४०) अशी मृतांची नावे आहेत. सर्व मृत शिवमोगा जिल्ह्यातील सागर येथील होते. सर्वजण हॉटेल व्यवसायासाठी बागलकोटला गेले होते. काम आटोपून हुबळी मार्गे शिवमोगा येथे परतत असताना हा अपघात झाला. याप्रकरणी हुबळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *