Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर तालुक्यात उद्या वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

खानापूर : खानापूर भागात उद्या दि. 20 मे रोजी 1 ते 6 दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

कर्नाटक वीज प्रसारण निगम लिमिटेड (केपीटीसीएल) च्या वतीने 110 के.व्ही. खानापूर उपकेंद्रामधून विद्युत पुरवठा होणारा लैला साखर कारखाना परिसर देवलत्ती, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपीनकट्टी, बरगाव, निडगल, दोड्डहोसुर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, लोकोळी, लक्केबैल, यडोगा, बळोगा, जैनकोप्प, गांधीनगर, हलकर्णी, कोर्ट परिसर, औद्योगिक वसाहत, बाचोळी, कौंदल, झाडनावगा, लालवाडी, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, कारलगा, शिवोली आणि चापगाव. त्याचप्रमाणे कर्नाटक वीज प्रसारण निगम लिमिटेड (केपीटीसीएल) च्या वतीने 33 के.व्ही. लोंढा आणि खानापूर सबस्टेशनवरून पुरवठा होणारा नागरगाळी, नागरगाळी रेल्वे स्टेशन, मुंडवाड, कुंभर्डा, तारवाड, लोंढा, लोंढा रेल्वे स्टेशन, गुंजी, मोहिशेट, वाद्रे, भालकी बी.के. भालकी के.एच. शिंदोळी, होन्नाळ, सावरगाळी, आंबेवाडी, तिवोली, डोकेगाळी, खानापूर टाउन, शिवाजी नगर, रुमेवाडी, ओतोली, मोदेकोप्प, नागुर्डा, रामगुरवाडी, आंबोळी, हरसनवाडी, असोगा, नेरसा, अशोकनगर, मणतुर्गा, शेडगाळी, आणि हेमाडगा परिसरात उद्या दि. 20-5- 2025 रोजी दुपारी 1 ते 6 वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामानिमित्त वीजपुरवठा खंडित होणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामेळावा : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात!

Spread the love  बेळगाव : आज रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *