Sunday , December 7 2025
Breaking News

डीसीसी बँक निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न; अन्यथा अरविंद पाटील यांच्या पाठीशी जारकीहोळी बंधू थांबणार : माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी

Spread the love

 

खानापूर : डीसीसी बँक बेळगाव संचालक मंडळाची निवडणूक 19 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही निवडणूक नेहमी पक्ष विरहित होत असते. खानापूर तालुक्यातून माजी आमदार व डीसीसी बँकेचे विद्यमान संचालक अरविंद पाटील यांना डीसीसी बँकेचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत. खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सुद्धा आपापसातील मतभेद विसरून अरविंद पाटील यांना पाठिंबा व्यक्त करावा अशी मी त्यांना पत्रकारांच्या माध्यमातून विनंती करतो. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करूनही शेवटी निवडणूक होत असेल, तर, आम्ही सर्व जारकीहोळी बंधू, रमेश जारकीहोळी, सतीश जारकीहोळी, स्वतः मी भालचंद्र जारकीहोळी व कुटुंबीय तसेच माजी खासदार प्रभाकर कोरे, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह, आदी मान्यवर मंडळी अरविंद पाटील यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणार असल्याचे, राज्याचे माजी मंत्री व केएमएफचे अध्यक्ष व अरभावी मतदार संघाचे विद्यमान आमदार भालचंद्र जारकीहोळी, यांनी शुभम गार्डन या ठिकाणी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी डीसीसी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब कुलगुडे, कित्तूरचे माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक महांतेश दोड्डगौडर, डीसीसी बँकेचे संचालक राजू अंकलगी, शंकरगौडा पाटील, माजी आमदार अरविंद पाटील उपस्थित होते. शुभम गार्डन खानापूर या ठिकाणी अरविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खानापूर तालुक्यातील सर्व पीकेपीएस सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सौहार्द सभेला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन वरील माहिती त्यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विठ्ठल हलगेकर हे आमच्या पक्षाचे, भाजपाचे आमदार आहेत. अरविंद पाटील हे सुद्धा भाजपाचेच आहेत. हलगेकर यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी को-ऑपरेटिव्ह क्षेत्र अरविंद पाटील यांना सोडावे अशी विनंती आम्ही करत आहोत. दोघांचे एकमेकाविरोधात मतभेद आहेत. दोघांनाही आपले मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे व हलगेकर यांनी अरविंद पाटील यांना पाठिंबा द्यावा, असे सांगितले. तसेच ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध न झाल्यास आम्ही सर्व जारकीहोळी बंधू व प्रभाकर कोरे यांच्यासह सर्व नेते मंडळी अरविंद पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे थांबणार असल्याचे सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरांतर्गत रस्त्याचा विकास आराखड्यानुसारच!

Spread the love  आमदार विठ्ठल हलगेकर यांची वकील संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही! खानापूर : खानापूर शहरांतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *