
खानापूर : खानापूर येथील बहुप्रतीक्षित इंदिरा कॅन्टीनचे आज उद्घाटन झाले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांनी स्वतः लोकांना नाश्ता वाढून या कॅन्टीनचे उद्घाटन केले.
ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे इंदिरा कॅन्टीन, माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आले होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि विठ्ठल हलगेकर यांनी पुढाकार घेऊन लोकांना नाश्ता वाटून कॅन्टीनचे उद्घाटन केले.

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महांतेश राहुत, ईश्वर घाडी, काँग्रेस नेते चंबण्णा होसमनी, संतोष हंजी, महांतेश कल्याणी, महिला ग्रामीण युनिटच्या दीपा पाटील, काँग्रेस शहर अध्यक्ष इसाक खान पठाण, पंच गॅरंटी प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांच्यासह भाजप नेते आणि सरकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta