
खानापूर : खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खानापूर-हेमाडगा-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा नजीक असलेल्या हालात्री पुलावर पाणी आल्याने या भागातील वाहतूक बंद झाली आहे. परंतु काही अतिउत्साही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून आपल्या गाड्या घालत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन या ठिकाणी बॅरिकेट्स लावून किंवा पोलीस बंदोबस्त ठेवून हा रस्ता बंद करण्याची मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
आज एका थार चालकाने आपला जीव धोक्यात घालून आपली पुलावरील पाण्यातून गाडी घातली. सुदैवाने नदी पुलावरील पाण्यातून तो सही सलामत बाहेर आला.

Belgaum Varta Belgaum Varta