
खानापूर : गर्लगुंजी, इदलहोंड, शिंगिनकोप, खेमेवाडी, गणेबैल, निटूर, प्रभुनगर, माळअंकले, झाडअंकले, बाचोळी, शिवाजीनगर आणि इतर गाव जांबोटी येथील नेम्मदी केंद्र येथे जोडण्यात आली आहेत. पण गर्लगुंजी आणि जांबोटीचे अंतर अंदाजे 25 ते 27 कि. मी. आहे. शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्येक लहान सहान सर्टिफिकेट, वारसा, इन्कम, डोमीसैल, इतर सर्वच महसूल, शैक्षणिक आणि शेती विषयी कामासाठी जांबोटी येथे जावे लागते पण अंतर 25 कि. मी. असल्यामुळे आणि रस्ते खराब, बस व्यवस्था, जंगली प्राण्यांची भीती या सर्व गोष्टींमुळे वरील पंचायती आणि गावातील नागरिकांना याचा भरपूर त्रास होत आहे त्यासाठी आज गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य यांनी महसूल मंत्री कृष्णभैरेगोडा यांना कुसमळी येथे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना कलाप्पा लोहार, मारुती पांडूचे, सतीश बुरुड, भरतेश तोरोजी, गुंडू टेकडी, विवेक तडकोड,सुरेश जाधव, देमांना बसरिकट्टी आदी उपस्थित होते.
दरम्यान, महसूल मंत्री यांनी निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना याविषयी क्रम घ्या असे सांगितले आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. नेमदी केंद्र गर्लगूंजी येथे झाल्यास पूर्ण गर्लगुंजी, इदलहोंड, निट्टूर, हलकर्णी, रामगुरवाडी पंचायत आणि या पंचायतमध्ये येणाऱ्या काही गावांना याचा फायदा होणार आहे, असे ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta