
खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांना विविध मागण्यांसंदर्भात प्रामुख्याने सरकारी जमिनी बळकावणे आणि कौलापूरवाडा येथील पोल्ट्री फार्म संदर्भात निवेदन देण्यात आले.
कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा आज दि. 30 जून रोजी कुसमळी येथील पुलाची पाहणी करण्यासाठी आले असता खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले.
मंत्री महोदयांना गायरान जमिनीसंदर्भात माहिती दिली व तालुक्यात अनेक ठिकाणी सरकारी जमिनी बळकावल्याचे देखील सांगितले. तसेच कौलापूरवाडा येथील पोल्ट्री फार्म संदर्भात निवेदन दिले आणि आपल्या समस्या सांगितल्या तसेच पोल्ट्रि फॉर्म संदर्भात सरकारी अधिकारी ग्रामस्थांना सहकार्य करत नसल्याचे देखील सांगितले व निवेदनासोबत प्रदूषण महामंडळाची 19/5/2025 ची ऑर्डर देखील महसूल मंत्र्यांना दाखविण्यात आली. यावेळी मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कौलापूरवाडा येथील पोल्ट्री फार्म संदर्भात जातीने लक्ष घालण्याचे आदेश दिले त्याचबरोबर तालुक्यातील गायरन जमिनी बळकावल्या आहेत त्या संदर्भात देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, महंतेश राऊत, महादेव कोळी, सुरेश जाधव, सावित्री मादार, प्रसाद पाटील, भैरू पाटील, विलास बेळगावकर, दीपक कवठणकर, संतोष हंजी, साईश सुतार, देमंना बसरीकट्टी, भरतेश तोरोजी, विवेक तडकोड, तोहीद चादखनवर, गुंडु टेकडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta