
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————–
——————————————————————-
खानापूर : जोयडा तालुक्यातील जगलबेट वनविभागात येणाऱ्या मिरासकुंबेलीजवळ असणाऱ्या नानेगाली येथील शेतकऱ्यावर काल मंगळवारी सायंकाळी अस्वलाने अचानक हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात मारुती मळेकर (वय 50) हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.
नानेगाळी येथील शेतातील काम आटपून रामनगर येथे घरी जाण्यासाठी शेतातून बाहेर पडून रस्त्यावरून मारुती मळेकर चालत येत होते. अचानक अस्वलाने त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात अस्वलाने मारुती यांचे डोके फोडले असून हाताला व पायालाही जखमा झाल्या आहेत. डोक्याला दुखापत केल्याने तो गंभीर जखमी आहे. याची माहिती रामनगर परिसरात पसरल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ रामनगर आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर बेळगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta