Sunday , July 26 2026
Breaking News

बडेकोळ्ळमठजवळ टाटा गाडीचा अपघात

Spread the love

 

अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/

——————————————————————–

——————————————————————–

बेळगाव : हिरेबागेवाडीजवळच्या बडेकोळ्ळमठ परिसरात एक भीषण अपघात घडला असून, टाटा इंट्रा वाहन चालकाने गाडी दुभाजकावर चढवून स्वतःचा जीव वाचवला आहे. या घटनेत तो थोडक्यात बचावला आहे.
बेळगावहून धारवाडच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट राष्ट्रीय महामार्ग ४ वरील दुभाजकावर आदळली. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक कार्यवाही करत अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून हटवले.

बडेकोळ्ळमठजवळचा महामार्गाचा भाग तीव्र वळणांचा आणि उताराचा असल्याने भरधाव वेगातील वाहनांच्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *