
खानापूर : आज सकाळी खानापूर तालुक्यातील हलसाल, बिजगर्णी (माचीगड) परिसरातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस माचीगड येथे नादुरुस्त झाल्याने काही विद्यार्थी दुधाच्या टेम्पोमधून प्रवास करत होते. टेम्पो नंदगडच्या दिशेने जात असताना एका नाल्यावरील पुलावर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो उलटला. यात काही विद्यार्थी नाल्याच्या पाण्यात तर काही रस्त्यावर पडून जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने खानापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta