बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर ते गोवा सीमेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या (एनएच ७४८) बांधकामात झालेल्या विलंबाबद्दल कंत्राटदारांना ३.२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लेखी उत्तर देणाऱ्या मंत्र्यांनी सांगितले की, या दुहेरी मार्गाच्या प्रकल्पाची लांबी ५२ किमी आहे आणि कंत्राटदारामुळे कामाला विलंब झाला आहे. आतापर्यंत ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
खानापूर विभागात २०.८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. येथे टोल वसूल केले जात आहे. खानापूर ते कर्नाटक सीमेपर्यंतचे काम पूर्ण झाले नसल्याने टोल वसूल केले जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Belgaum Varta Belgaum Varta