
खानापूर : सर्पदंशाने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुंभार गल्ली नंदगड येथे घडली आहे. वेदांत असे या दुर्दैवी बालकांचे नाव आहे.
वेदांत हा घरात झोपला असता अंथरुणातच त्याला सर्पदंश झाला. ही बाब कुटुंबीयांना समजताच वेदांतच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचाराचा उपयोग न होता सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेदांतचे वडील सतीश कुंभार हे गवंडी कामगार असून वेदांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. वेदांत हा नंदगड येथे इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत होता. वेदांतचा मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta