खानापूर : शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने शुक्रवारी (ता. १५) रोजी दुपारी साडे तीन वाजता विठ्ठल मंदिर येथे हलशी ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा व गुंडपी गावातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा इयत्ता चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी व आठवी ते दहावी या तीन गटात घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांचे सहकार्य लाभले आहे. विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा स्पोर्ट्सतर्फे करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta