खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब भरणे समारंभ शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. बाबुराव गणपतराव पाटील- माजी अध्यक्ष के.एम. एफ. हे होते.
प्रास्ताविक रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष श्री. आबासाहेब दळवी यांनी केले. मंदिराच्या कळसाचे स्लॅब श्री. अमृत महादेवराव शेलार-चेअरमन दि. खानापूर तालुका को-ऑप बँक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश फोटो पूजन श्री. जयसिंग आण्णाप्पा देसाई, रवळनाथ देव पूजन श्री. नूतन देवाप्पा गुरव, विठ्ठल रुक्मिणी पूजन श्री. महेश गणपती पाटील, श्रीकृष्ण पूजन श्री. संतोष सदाशिव दळवी, कासव पूजन श्री. प्रभाकर बोबाटे, कलावती पूजन श्री. कल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या समारंभात विविध देणगीदारांनी उदारहस्ते योगदान दिले. प्रमुख देणगीदारांमध्ये..
१. अमृत महादेव शेलार -५१०००
२. राहुल अशोकराव पाटील -१११११
३. रमेश लोहार -५५५१
४. जयसिंह देसाई – ५०२१
५. संतोष दळवी -५०००
६. ईश्वर बोबाटे-११०१
७. प्रल्हाद गुंडपीकर १०००
८. यशवंत देसाई १००१
९. रिचर्ड अल्मेडा १०००
१०. प्रल्हाद मादार १०००
तसेच मारुती देवलतकर, संजय गुंडपीकर, जितेंद्र गुंडपीकर, बाबुराव पाटील, गजानन गुरव, अनुष्का भटवाडकर, संगीता पाटील, वर्षा पाटील, यशोदा पाटील, कविता देवकरी, अजित पाटील, महेश पाटील, नागेंद्र कानशीनकोप, दिव्या गुंडपीकर, हणमंत पाटील, मारुती देवकरी, सण्णा हणबर, मोहन देवकरी, सुभाष पाटील, कृष्णा देवलतकर, नागेश पाटील, मारुती दळवी, रिटा फर्नांडिस, दत्तू पाटील, गणपती भुत्तेवाडकर, संजय देवलतकर, विठ्ठल देसाई आदी देणगीदारांनीही बहुमोल योगदान दिले.
यावेळी एसडीएमसी कमिटी मणतुर्गे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून श्री रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार समिती आणि सुर्योदय ग्रुप मणतुर्गे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब शेलार कार्याध्यक्ष जीर्णोद्धार समिती, प्रकाश पाटील, मलाप्पा देवलतकर, शांताराम पाटील, नामदेव गुरव, मरू देवकरी,श्रीकांत भटवाडकर, वसंत देवलतकर, राजाराम पाटील, कुमारी वैभवी जाधव आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta