खानापूर : शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शुक्रवारी हलशीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने हलशी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील शाळामधील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी निवृत्त सुभेदार शंकर देसाई यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात पूजन करण्यात आले. माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई, सुभेदार देसाई, हलशी येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक एस टी पाटील, गुंडपी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई, ग्राम पंचायत सदस्य दिनेश देसाई, हलशी पिकेपीएसचे माजी अध्यक्ष सुधीर देसाई, निवृत्त सैनिक विलास देसाई, सयाजी देसाई आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. युवा स्पोर्ट्सचे पदाधिकारी कुमार देसाई यांनी स्वागत केले.
माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी येणारा काळ स्पर्धात्मक असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे आवश्यक असून सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करून कार्यकर्त्यांनी चांगला उपक्रम राबविला आहे. येणाऱ्या काळातील अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे मत व्यक्त केले. नरसेवाडी येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक जी एन पाटील यांनी स्पर्धेची माहिती दिली. मिलिंद देसाई यांनी स्पर्धेसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे मोठे सहकार्य लाभले असून स्पर्धेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. येत्या गुरुवारी विविध मान्यवरांच्या हस्ते हलशी येथील सरकारी मराठी शाळेमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. स्पर्धा चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी व आठवी ते दहावी या गटात घेण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रघुनाथ देसाई, वामन देसाई, बंडू देसाई, राजन सुतार, शुभम देसाई, प्रशांत देसाई, वैभव देसाई, ज्ञानेश्वर देसाई, निलेश देसाई, राम देसाई, नाना देसाई, शाम देसाई आदींनी परिश्रम घेतले.

Belgaum Varta Belgaum Varta