
खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात जनजागृतीपर दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. वाढते अपघात मृत्यू रोखण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासाचा संदेश देण्यासाठी ही फेरी काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांना हेल्मेटचे वाटपही करण्यात येणार आहे.
शुक्रवारी (दि. २२) रोजी सकाळी ११ वाजता दुर्गानगर येथील डॉ. निंबाळकर यांच्या ‘रायगड’ निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी आणि महांतेश राऊत यांनी केले आहे. या उपक्रमातून हेल्मेटच्या वापराबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta