
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगडजवळील गर्भाणट्टी येथे स्कूल बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
बिडी गावातून विद्यार्थ्यांना सोडून परत येत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बसला नंदगडकडून बिडीकडे जाणाऱ्या दुचाकीने नियंत्रण सुटल्यामुळे धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. नंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, ते अधिक तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta