गुंजी (संदीप घाडी) : खानापूर तालुक्यातील गुंजी येथील सार्वजनिक गणेश “गुंजीचा राजा”ची मिरवणूक ढोल व ताशा अशा पारंपारिक वाद्याच्या गजरात उत्साहात संपन्न झाली. सार्वजनिक श्री गणेश युवक मंडळाचे अध्यक्ष वासुदेव नागो गोरल यांच्या नेतृत्ववाखाली दि. 27 ऑगष्ट रोजी ढोल, ताशा आणि ह.भ.प. महाराज यांच्या भजनाच्या गजरात गावात संवाद्य मिरवणूक काढत श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. 30 ऑगष्ट रोजी श्री सत्यनारायण पूजा करून गणेश युवक मंडळाने महाप्रसादाचे आयोजन केले होते. ह्या महाप्रसादासाठी गावातील व परिसरातील गणेश भक्तांनी सढळ हस्ते मदत केली. याचं बरोबर गुंजीतील इतर मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा सहभाग होता. गुंजी सर्वजनिक श्री गणेश मंडळाचे उपाध्यक्ष महेश कापोलकर, जोतिबा धोंडिबा करंबळकर व मंडळाचे सेक्रेटरी संदीप गावडे, सुरज हलगेकर मंडळाचे खजिनदार संजय कुट्रे, दिनेश चव्हाण आणि मंडळाचे सभासद नामदेव गावडे, नागेश कुंद्री, प्रशांत बावकर आणी मंडळाचे इतर सभासद यांचा मोठा सहभाग होता.
Belgaum Varta Belgaum Varta