खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील पीकेपीएस सोसायटीचे व्यवस्थापक खंडोबा राऊत व सचिव श्रीनाथ खाडे हे अचानक बेपत्ता झाल्याने सोसायटीचे कामकाज ठप्प झाले आहे. या घटनेमुळे सोसायटीच्या दैनंदिन कामकाजावर आणि निवडणुकीत अडथळा निर्माण झाला आहे.
यासाठी सोसायटीच्या अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी सहकारी संस्थेचे सहायक निबंधक यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे.
सोसायटीच्या अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी कार्यालयाला भेट दिली असता कार्यालय कुलूपबंद अवस्थेत आढळले. त्यांनी व्यवस्थापक व सचिवांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र, सर्व मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळले.
या घटनेमुळे डीसीसी बँक निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे, ठराव पुस्तके व अन्य महत्त्वाची माहिती गायब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात अध्यक्षा सरदेसाई यांनी सहायक निबंधक, बेळगाव यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta