हुबळी : प्रवाशांच्या सोयीसाठी, दक्षिण पश्चिम रेल्वेने १५.०९.२०२५ पासून खानापूर (केएनपी) रेल्वे स्थानकावर ट्रेन क्रमांक १७३१७/१७३१८ एसएसएस हुबळी-दादर-एसएसएस हुबळी एक्सप्रेस गाड्यांना एक मिनिट थांबा दिला आहे. ट्रेन क्रमांक १७३१७ (एसएसएस हुबळी-दादर) १७:५९ वाजता खानापूरला पोहोचेल आणि १८:०० वाजता निघेल. त्याचप्रमाणे, १६.०९.२०२५ रोजी, ट्रेन क्रमांक १७३१८ (दादर-एसएसएस हुबळी) खानापूर येथे सकाळी ८:४० वाजता पोहोचेल आणि सकाळी ८:४१ वाजता निघेल. प्रवाशांना या थांबा सुविधेचा योग्य वापर करण्याची विनंती केली आहे. रेल्वे राज्यमंत्री सोमवारी दुपारी साडेतीन दरम्यान बेळगाव, अनगोळ तसेच खानापूर येथे सायंकाळी एका रेल्वे फाटकाच्या मार्गाची पायाभरणी करणार आहेत. खानापूर येथील रेल्वे फाटक पायाभरणी नंतर ते हुबळी -दादर – हुबळी एक्सप्रेस रेल्वेला खानापूर स्टेशन येथे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta