खानापूर : मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकल मराठा समाज खानापूर तालुका यांच्यावतीने राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ११ वाजता मराठा समाजातील सर्व घटकांना आमंत्रित करण्यात येत आहे. लवकरच कर्नाटक राज्यात जनगणना होत आहे, या जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खानापूर शहर आणि तालुका परिसरातील मराठा समाजाला कशा पद्धतीने आपले नाव जनगणनेत नोंद करावी, आणि ही नोंद करताना मराठा समाजातील नागरिकांनी कोणत्या रकान्यापुढे आपली नोंद करणे गरजेचे आहे हे समजावून सांगण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, त्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. समाजातील तरुणाईच्या हितासंबंधी जागृती करणे गरजेचे आहे त्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी या बैठकीसाठी हजर राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज खानापूर तालुका यांच्यामार्फत विद्यमान आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, माजी आमदार श्री. अरविंद पाटील, माजी आमदार सौ. अंजली निंबाळकर, श्री. गोपाळराव देसाई, ॲड. आय. आर. घाडी, ॲड. एच्. एन. देसाई, श्री. मुरलीधर पाटील, श्री. आबासाहेब दळवी, श्री. प्रकाश चव्हाण, श्री. दिलीप पवार, श्री. संजय कुबल, श्री. महेश गुरव यांच्याकडून करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta