खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगल भागात वनप्राण्याचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा कधी अस्वलाचा हल्ला तर कधी गवी रेड्याचा हल्ला असे प्राणघातक हल्ले होत असताना रविवारी दि. १४ रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हुळंद (ता. खानापूर) येथील शेतकरी वासुदेव नारायण गावडे यांच्यावर गावापासुन जवळ असलेल्या माळावर अस्वलाने हल्ला केल्याने वासुदेव गावडे हा गंभीर जखमी झाला असुन त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. ही बातमी काँग्रेस कार्यकर्त्याना समजताच एसीएफ सुनीता निंबरगी तसेच कणकुंबी आरएफओ याना संपर्क साधुन ताबडतोब उपचारासाठी सहकार्य करण्याची सुचना केली आहे.
लागलीच त्याच्यावर उपचार करण्यासाठी मदत करणार असल्याचे एसीएफ सुनीता निंबरगी यानी त्याना सांगितले.
लागलीच वासुदेव नारायण गावडे यांना ऍम्ब्युलन्स बेळगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
वनखात्याने हलगर्जीपणा न करता ताबडतोब सर्व उपचार करावेत अन्यथा खानापूर ब्लॉक काँग्रेस गप्प बसणार नाही, असे सुनावले.
Belgaum Varta Belgaum Varta