

खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर विद्यार्थिनींच्या अंगभूत कौशल्यावर अधिक भर देणारे कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगती बरोबर क्रीडा कौशल्याकडे जातीने लक्ष दिले जाते!
मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर खेळाडू विद्यार्थ्यांसाठी मराठा मंडळ शिक्षण संस्थेमध्ये विविध क्रीडा उपक्रम राबविले गेले आहेत त्याची फलश्रुती म्हणजे बेळगाव जिल्ह्यात घेण्यात येत असलेल्या विविध क्रीडा स्पर्धात खेळाडू विद्यार्थी चमक दाखवत आहेत.
याचच एक भाग म्हणजे
पदवीपूर्व विभागाने नुकत्याच आयोजित केलेल्या बैलहोंगल येथे जिल्हास्तरीय खो -खो स्पर्धेमध्ये ताराराणी कॉलेजने उपांत्यपूर्व फेरीमध्ये अंगभूत कौशल्याच्या जोरावर काॅलेजचे कोच प्रशांत पाखरे व श्री मळीक यांनी घटवून सिंगल चेन, डबल चेन, पोल डाईव्ह आणि खांब चकवा या बलस्थानांचा वापर करून
बेळगाव तालुक्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बलाढ्य अशा ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयाचा रोमांचकारी पराभव करून अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात तुल्यबळ सौंदत्ती तालुक्यातील संघाचा मजबूत पकड, लवचिकता समन्वय आणि उत्तम टीमवर्क यांचे उत्तम प्रदर्शन करीत उपस्थित क्रीडाप्रेमींची मनं जिकत एकतर्फी पराभव केला. आता ताराराणीचा हा संघ राज्य पातळीवर होणाऱ्या खो- खो संघाचे बेळगाव जिल्हयाचे प्रतिनिधित्व करून राज्यस्तरीय सामने खेळण्याचा कसून सराव करीत आहे.
जिल्हास्तरीय खो खो जिंकणाऱ्या संघाचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयांने श्री सिध्दीविनायक इंग्रजी माध्यम खानापूर यांच्या ढोल पथकाच्या जोशपूर्ण वादनासह फटक्यांची आतिषबाजी करीत पुष्प पाकळ्यांची उधळण करीत, खो- खो कॅप्टन कुमारी निलम नामदेव कक्केरकर व कबड्डी कॅप्टन कुमारी लक्ष्मी गोरल यांच्या डोकीवर पुणेरी पगडी बांधून वाजतगाजत शाही स्वागत करून त्यांच्या कष्टाला काॅलेजमधील अकरावी बारावीच्या शेकडो विद्यार्थिंनीनी मानवंदना दिली.
शिवाय मराठा मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री. शिवाजीराव पाटील व परशराम गुरव, मुख्याध्यापक श्री. राहूल जाधव, काॅलेजचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील व समस्त प्राध्यापक वर्गाने खेळाडू विद्यार्थीनींना व कोच आप्पाजी पाटील, प्रशांत पाखरे यांना पेढे चारवून हा विलोभनीय आनंद द्विगुणित केला!
या विजय खेळाडूंना मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांनी मनस्वी अभिनंदन करीत खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या असून
स्वागत समारंभासाठी मराठा मंडळचे ज्येष्ठ संचालक श्री. परशुराम गुरव, श्री. शिवाजीराव पाटील, उपस्थित होते. विजेत्या संघाचे स्वागत करण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील सर तसेच संपूर्ण कॉलेजचा श्री. एन ए पाटील, श्री. टी आर जाधव, श्री. पी व्ही कर्लेकर, श्री. नितीन देसाई, श्रीमती एम वाय देसाई, श्रीमती व्ही एम गावडे, श्रीमती सी एस कणबरकर, आरती नाईक, दिपाली निडगलकर, सोनल पाटील, सीमा पाटील, चित्रा अर्जुनवाडकर व जोतिबा घाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta