Tuesday , March 3 2026
Breaking News

हत्तरवाड येथील शेतकऱ्याला सर्पदंशाने मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथील एका शेतकऱ्याला सर्पदंश झाल्याने इस्पितळात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून गणपती नारायण हलसकर (वय 52) असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपती हलसकर हे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी, आपल्या शेतामध्ये काम करत असताना विषारी सर्पाने दंश केला. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर काही शेतकऱ्यांनी तात्काळ ॲम्बुलन्स बोलावून त्यांना नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

गणपती हलसकर यांच्या पश्चात पत्नी, अविवाहित मुलगा, विवाहित मुलगी व वयस्कर वडील असा परिवार आहे.
त्यांचा अंत्यसंस्कार आज मंगळवार, दिनांक 14 ऑक्टोबर रोजी हत्तरवाड येथे पार पडणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *