

खानापूर : माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नवी दिल्लीतील काँग्रेसच्या इंदिरा भवन कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभाग नोंदवला.
यावरी डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांच्या अखत्यारीतील उत्तराखंड राज्याच्या ‘संघटन सृजन अभियान’ या उपक्रमाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. या आढाव्यात त्यांनी आपल्या कामाचा प्रगती अहवाल पक्षासमोर ठेवला. उत्तराखंडमध्ये पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि नवी दिशा देण्यासाठी पुढील कार्ययोजना तयार करण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.
खानापूरच्या माजी आमदार असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी बैठकीत उत्तराखंडमधील संघटनात्मक कामाची माहिती दिली. पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी अधिक प्रभावी रणनीती निश्चित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.या महत्त्वाच्या बैठकीला खासदार आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, उत्तराखंडच्या प्रभारी खासदार कुमारी सेलजा, खासदार सेंथिल आणि वाम सिचंदर रेड्डी यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta