Monday , September 21 2026
Breaking News

माजी नगरसेवक नेताजी नारायण जाधव यांचा आज अमृतमहोत्सव सोहळा!

Spread the love

 

बेळगाव : माजी नगरसेवक नेताजी नारायण जाधव यांनी सामाजिक सहकार्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन आज दि. १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

बेळगाव येथील मराठा मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, मराठा को-ऑप बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि ‘द बेळगांव बेकर्स को-ऑप. सोसायटी’चे माजी चेअरमन शिवाजीराव हंगीरगेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *