

खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयात अनागोंदी कारभार चालला असून तहसीलदार कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोरब येथील 164 एकर जागा बळकविण्याचा काही भूमाफियांचा प्रयत्न असल्याचा संशय खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसला आहे.
मोरब येथील सर्वे नंबर 21 व 22 येथील जागा अनाधिकृत रित्या बळकाविण्याचे जोरदार प्रयत्न चालू असून त्यामध्ये तहसीलदार ऑफिसमधील काही अधिकारी गुंतले असल्याची दाट शक्यता आहे. खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस यावर बारीक लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात खानापूर तहसीलदाराला विचारणा केली असता माझ्या लॉगिनला हे प्रकरण येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तहसीलदार कार्यालयातील काहीजण खोटी कागदपत्रे जोडून जमिनी बळकाविण्यात रमले असल्याचे ऐकिवात येत आहे. या संदर्भात चार ते पाच तक्रारी खानापूर ब्लॉक काँग्रेसकडे आल्या असून त्याची पडताळणी चालू आहे. लवकरच लोकायुक्तांकडे कागदपत्रांसहित तक्रार दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये जर कोणी अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल यात मात्र शंका नाही. गोरगरीब जनतेच्या जमिनी नियमबाह्यपणे हडपण्याचे प्रकार खानापूर तालुक्यात सुरू आहेत याला सरकारी अधिकारी देखील तितकेच जबाबदार आहेत. याबाबत लवकरच लोकायुक्तांकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असून खानापूर ब्लॉक काँग्रेस गोरगरीब जनतेच्या किंवा सरकारी जमिनी हडप करणाऱ्यांच्या विरोधात नक्कीच आवाज उठवणार व कायदेशीर मार्गाने देखील लढा देण्यास सज्ज असणार खानापूर तहसीलदार कार्यालयात तीन, चार अधिकारी या ही चुकीची कामे करण्यात गुंतले आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची खानापूर तहसीलदारांनी तात्काळ बदली करावी अशी मागणी काँग्रेसतर्फे वारंवार केली असून यावर खानापूर तहसीलदारांनी तात्काळ योग्य निर्णय घ्यावा त्याचप्रमाणे जांबोटी सर्कल यांच्या बदलीचे आदेश आले असताना देखील अजूनही ते जांबोटी येथेच कार्यरत आहेत. खानापूर तहसीलदारांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta